शहा विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव संपन्न

प्रथम, व्दीतीय, तृतीय क्रमांकाने यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसह ९०% हून जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तेवीस मुलांनाही यावेळी संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.

शहापूर : किन्हवली येथील विद्या प्रसारक मंडळाच्या शहा चंदूलाल सरुपचंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी गुणगौरव समारंभ संस्थेचे अध्यक्ष अरविंद अप्पा भानुशाली यांच्या शुभ हस्ते नुकताच संपन्न झाला.शहा विद्यालयाचा इयत्ता दहावीचा एकूण निकाल ९८ % इतका लागला असून सोगाव हायस्कूल ९२.४२ % तर
ठुणे विभाग शारदा विद्यालय,ठुणे शाळेचा निकाल १०० % आणि इंग्लिश मेडियम स्कूल किन्हवलीचा निकाल१०० % एवढा लागला आहे. मुगाव येथील सा.गो.घनघाव विद्यालयाचा निकाल देखील १०० %इतका लागला असून या सर्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकांचा
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे प्रथम, व्दीतीय, तृतीय क्रमांकाने यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व ९० % हून जास्त गुण प्राप्त करणाऱ्या तेवीस मुलांनाही यावेळी संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.
विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद अप्पा भानुशाली, किन्हवली महाविद्यालयाच्या प्राचार्या सुषमा हसबसनीस,संस्थेचे उपाध्यक्ष जयवंत वेखंडे, ,ज्येष्ठ संचालक नाना भेरे, मल्हारी करण,विठ्ठल गगे, लक्ष्मण बांगर, उपमुख्याध्यापक एन के पाटील, ए जी घनघाव, एम वाय निकम,
ए डी घायवट, पत्रकार शामकांत पतंगराव , बी.एम. वरकुटे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अप्पा भानुशाली यांनी विद्यार्थी व पालकांना या वेळी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यार्थानीही आपली मनोगते व्यक्त केली.
मान्यवरांपैकी संचालक विठ्ठल गगे, शामकांत पतंगराव यांची यथोचित मार्गदर्शन पर भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.के. पाटील यांनी सादर केले. सूत्रसंचलन गोपाळ वेखंडे यांनी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले तर अश्विनी सोनार यांनी आभार मानले.
वर्गशिक्षक वाघ डी एम,लहासे ए डी, सोनार ए एम, किरण करण, जी.टी.खकाळ, सासे पी टी., दिनेश फर्डे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
विद्यार्थी, पालक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीने खच्चून भरलेल्या अल्पबचत सभागृहात अगदी खेळीमेळीच्या वातावरणात गुणगौरव सोहळा संपन्न झाला.

 595 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.