आंदोलनामुळे वाहतूक काही काळ झाली होती ठप्प
शहापूर : कर्नाटक राज्यात बेळगावमधील एका गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा काढून टाकण्यात आला.हिंदूंचे आराध्य दैवत व महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या शिवरायांची विटंबना केल्याबद्दल आज किन्हवलीत शिवसेनेने कर्नाटक भाजप सरकारचा पुतळा जाळून आंदोलन केले.या वेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
या वेळी उपतालुका प्रमुख विकास गगे,बाळकृष्ण विशे,विभागप्रमुख लक्ष्मण बांगर,शहरप्रमुख मनोज भोईर,निखिल धानके,अजिम शेख,मिलिंद यशवंतराव, काळूराम बांगर,संजय बांगर,स्वप्नील भेरे,अक्षय शिंदे,महेश मोरे आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
547 total views, 2 views today