कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या विरोधात कल्याणात शिवसेनेचे आंदोलन

नाहीतर शिवसेना कर्नाटकात घुसून आपल्या पध्दतीने हा पुतळा स्थापन करेल शिवसेना पदाधिकाऱ्यांचा इशारा

कल्याण : कर्नाटक सरकारने  बेळगाव मधील मनगुता  गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत असून  रविवारी दुपारी कल्याणात या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेतर्फे या कृत्याचा निषेध करण्यात आला. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त शिवसैनिकांनी उग्र निदर्शने करत कर्नाटक सरकारचा निषेध केला.
येडीयुरप्पा हाय हाय, कर्नाटक भाजप सरकारचा निषेध अशा आशयाच्या जोरदार घोषणाही यावेळी देण्यात आल्या. एकीकडे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे नाव घेऊन मत मागायची आणि  दुसरीकडे रातोरात महाराजांचे पुतळे हटवायचे अशा भाजप सरकारचा करावा तितका निषेध कमी असल्याचेही शिवसेनेतर्फे यावेळी सांगण्यात आले. तर कर्नाटक सरकारने लवकरात लवकर हा पुतळा बसवला नाहीतर शिवसेना कर्नाटकात घुसून आपल्या पध्दतीने हा पुतळा बसवले असा इशाराही यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी माजी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते प्रकाश पेणकर, नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक सचिन बासरे शहर शिवसेचे कल्याण डोबिंवली महापालिका संघटक रवी कपोते,  शिवसेना महिला जिल्हा संघटक विजया पोटे, माजी नगरसेवक सुनील वायले, विघाधर भोईर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

 325 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.