सम्राट अशोक विद्यालयाने यापूर्वी देखील कारागृहातील कैदी बांधवांना, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत, रिक्षावाल्या दादांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे.
कल्याण : बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचा सण रक्षाबंधन याच दिवशी आपले अनेक सैनिक आपल्या कर्तव्यामुळे आपल्या बहिणीच्या प्रेमापासून दूर राहतात. आपल्या सैनिकांना रक्षाबंधन सणाचा आनंद घेता यावा यासाठी सम्राट अशोक विद्यालयाने आपल्या जवानांना राख्या पाठवत त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.
सम्राट अशोक शाळेचा माजी विद्यार्थी सुदेश सदाशिव यादव हा सध्या अरुणाचल प्रदेश येथील तवांग शहरालगत असलेल्या भारत व चीनच्या सीमेवर देशाचे रक्षण करत आहे. सुरेश यादव या विद्यार्थ्यांशी शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी संपर्क साधून कोळसेवाडी पोलिस स्टेशन गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक मधुकर भोगे साहेब यांच्या सहकार्याने सुदेश यादव रहात असलेल्या सैनिक छावणीच्या पत्त्यावर स्पीड पोस्टने राख्या पाठवल्या. राख्या मिळाल्यावर जवानांनी एकमेकांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा आनंद घेतला.
सम्राट अशोक विद्यालयाने यापूर्वी देखील कारागृहातील कैदी बांधवांना, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत, रिक्षावाल्या दादांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला आहे. यावर्षी covid-19 मुळे विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता परंतु कार्यक्रमाचे सातत्य रहावे म्हणून मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सहशिक्षक गणेश पाटील व गणेश पालांडे यांच्या मदतीने देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या प्रति आदर व्यक्त करत छोटासा कार्यक्रम केला.
837 total views, 1 views today