शहापूर तालुक्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रात भात लावणी झाली असून पावसाने दडी मारल्याने५ ते १० टक्के भातलावणीची कामे अपूर्ण होती.
शहापूर(शामकांत पतंगराव) : ऐन भात लावणीच्या हंगामात दडी मारलेल्या पावसाने बुधवारपासून (दि. ५) पुन्हा दमदार हजेरी लावली असून काही शेतकऱ्यांच्या अपूर्ण राहिलेल्या भात लावणीच्या कामांना जोर आला आहे.
शहापूर तालुक्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रात भात लावणी झाली असून पावसाने दडी मारल्याने५ ते १० टक्के भातलावणीची कामे अपूर्ण होती.पठारी भागात भातशेती पाठोपाठ वरई,नाचणी आदी पिके घेतली जातात तसेच उडीद,खुरासणी,तीळ आदी जोड पिकेही घेतली जातात.दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रभारी तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय यांनी टाकीपठारसारख्या आदिवासी भागातील शेतीची पाहणी करून लावणी केलेली भाताची रोपे कशी जगवावी याचे शेतकऱ्याना मार्गदर्शन केले होते. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस परतल्याने शेतकरी आनंदीत झाले आहेत.
476 total views, 1 views today