शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर यांचे निधन

कोरोना विरुध्दची लढाई ठरली अयशस्वी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील शिवसेना गटनेते दशरथ घाडीगांवकर ( वय -६३) यांचा मुंबई येथील  खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाल्याने गेले महिनाभर सुरु असलेली मृत्युशी झुंज अखेर संपली. त्यांच्या पश्चात पत्नी विवाहीत मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
घाडीगावकर यांना ८ जुलै रोजी कल्याणच्या खाजगी रुग्णालयात तर १३ जुलै पासून मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महानगरप्रमुख विजय साळवी, माजी महापौर राजेंद्र देवळेकर आदींनी त्यांची आस्थेने चौकशी करत त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. आमचे लाडके घाडीगावकर गेले..एक मेहनती शिवसैनिक गेला..अशी भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

 473 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.