ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात साजवली गावाजवळ हे भातसा धरण आहे. मुंबईला पाणीपुरवठा या धरणातून होतो.
हे धरण भातसा व चोरणा या नद्यांच्या संगमावर बांधले आहे. चोरणा ही भातसा ची उपनदी असून महाराष्ट्रतील दगडी बांधकाम असलेले हे सर्वांत उंच धरणं आहे
शहापुर (शामकांत पतंगराव ) : शहापुर तालुक्यात धरण क्षेत्रात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आत्ता पर्यंत पाऊस कमी पडत असतांनाच गेले दोन दिवस तालुक्यासह धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. तर गायब झालेला पाऊस गेल्या दोन दिवसांपासून
दमदारपणे सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धरणातील पाण्याची पातळी ही वाढत आहे.
शहापूर तालुक्यात मागील वर्षी २९६३ मिलिमीटर इतका एकुण पाऊस पडला होता. तर यंदा तालुक्यात पावसाने जून महिन्यात दमदार सुरुवात केली. भात पीक लावणी हंगामाला चांगलाच वेग आल्याचे चित्र असतांनाच गेले काही दिवस पाऊस गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.
मुबंईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत होते.
मात्र गेले दोन दिवस तालुक्यात व धरण क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने तर बुधवारी एका दिवसात ५६ मिलिमीटर पाऊस पडल्याने आत्तापर्यंत तालुक्यात एकूण १२३४ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. मागील वर्षी २०१९ साली ८८.८५ टक्के पाणी साठा भातसा धरणात होता. तर यंदा आतापर्यंत हा पाणी साठा ५८.१४ टक्के इतका असल्याचे सांगण्यात आले.
610 total views, 2 views today