कोरोना: मुंबईत स्थिर, ठाण्यात संख्या घटली तर घरी जाणाऱ्योक्षा बाधित जास्त

११ हजार ५१४ नवे बाधित, १०८५४ जण घरी तर ३१६ मृत्यूची नोंद

मुंबई : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कोरोनाच्या प्रसारावर मुंबई महापालिकेने चांगलेच नियंत्रण मिळविले असून मागील काही दिवसांपासून शहरातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २० हजारावर स्थिर राहीली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ३४ हजारावर असलेली संख्या आता २७ हजारापर्यत खाली आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही संख्या चांगल्यापैकी बरे होवून घरी जात असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ११५१४ नव्या बाधितांचे निदान झाले असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ३०५ तर एकूण रूग्ण ४ लाख ७९ हजार ७७९ इतकी झाली आहे. शिवाय आज १० हजार ८५४ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख १६ हजारावर पोहचली असून ३१६ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ६५.९४ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर ३.५० % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २४,८७,९९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,७९,७७९ (१९.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,७६,३३२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,७६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

 511 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.