झोपी गेलेले जागे झाले….ठामपाने पाठविले १९ लाखाचे पाणी बिल

सोसायटी सदस्य आणि महापौरांच्या आदेशाला केराची टोपली

आतापर्यंत पाणी बिल वसुली झाली नाही रहस्य काय ?

३० वर्ष जुन्या सोसायटीचे २५ वर्षाचे थकीत पाणी बिल

ठाणे : एकीकडे महसूल वाढविण्यासाठी मालमत्ता कर आणि पाणी बिलाच्या वसुलीचे उद्दिष्ट आयुक्तांनी दिल्यानंतर  बिलाच्या वसुलीकडे दुर्लक्ष करून वसुलीचा डोंगर उभा केल्याचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. कोपरी पूर्व परिसरातील श्रमदान को-ऑप सोसायटी लि.ला पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाठविले १९ लाखाचे बिल, अनेक दशके या सोसायटीचे पाणी बिलच वसूल करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. सोसायटी सदस्यांना स्वतंत्र पाणी बिल द्या अशी मागणी वारंवार केल्यानंतर आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे वारंवार सांगून सुध्दा यांनी पाणीपुरवठा विभागाला आदेश दिल्यानंतरही अमलबजावणी करण्यात आलेली नाही. विशेष असे की, सादर प्रस्ताव हा महासभेतही चर्चिला गेला होता.  परिणामी आता १९ लाखाचे थकीत  बिल भरायचा कसा असा प्रश्न सोसायटीच्या सदस्यांना प्रश्न पडला आहे. दुसरीकडे मात्र पालिका पाणी पुरवठा विभागाने ” झोपी गेलेला जागा झाला” प्रमाणे १९ लाखाचे पाणी पाठवून व्याजावर व्याज वर लावण्यात आल्याचे दिसत आहे. 
  कोपरी पूर्व परिसरातील श्रमदान को.ऑप.सोसायटी लि ही २० सदस्य असलेली सोसायटी असून या सोसायटीच्या लाखो रुपयांच्या पाणी थकबाकीची रहस्य काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोसायटीतील काही लोक पाणीबिल भरण्यास टाळाटाळ करीत आजचे मरण उद्यावर ढकलत तब्बल २० वर्ष चालढकल करण्यात आली. सोसायटीच्या अन्य सदस्यांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त यांच्याकडे अनेकवेळा लेखी स्वरूपात निवेदन देऊन पाणी बिल प्रत्येक सोसायटी सदस्यांना त्यांच्या नावावर व्यक्तिगत देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे.  यामुळे सोयीनुसार ज्यांना पाणी बिल भरायचे आहे ते भरतील त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत महसूल वाढेल. कोपरी पूर्व परिसरात सोसायटीच्या सदस्यांनी मागणी केल्यानुसार  त्यांच्या नवे पाणी बिल मिळते मात्र श्रमदान सोसायटीद्वारे वारांवारच्या मागणीनंतरही पाणीपुरवठा विभाग किंवा पालिका आयुक्त कुठलीच दाखल घेत नसल्याचे समोर आले असून पाणीबिल पोटी आज पालिकेला १९ लाखाचा चुना लागत असल्याचे चित्र आहे. पालिका आयुक्तानी या समस्येबाबत जातीने लक्ष घालून झालेल्या दिरंगाई आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता रहिवाशी करीत आहेत. 

तत्कालीन महापौरांच्या आदेशाला केराची टोपली?

 श्रमदान को.ऑप.सोसायटी लिमिटेड च्या निवासी नागरिकांनी इतर कोपरीतील सोसायटी प्रमाणे सोसायटीतील प्रत्येक सदस्यांच्या नावाने पाणी बिल काढण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीचा गंभीरतेने विचार करून तत्कालीन महापौर मीनाक्षी शिंदे यांनी त्वरित पाणीपुरवठा विभागाला कोपरी पूर्व श्रमदान को.ऑप. सोसायटी लि च्या रहिवाशांचे इतर सोसायटी प्रमाणे प्रत्येक सदस्याला व्यक्तीगत नावावर पाणी बिल द्यावे असे आदेश लेखी स्वरूपाचे व महासभेत चर्चा  होऊन सुद्धा आदेशाची अमलबजावणी न करता त्याला केराची टोपली दाखविली. प्रत्येक सदस्याला स्वतंत्र पाणी बिल पाठविल्यास काही सदस्य व्यतिरिक्त अन्य सदस्य पाणी बिलाचा भरणा वेळेवर केल्याने पालिकेच्या महसुलात वाढ होईल. मात्र कोमात गेलेल्या पाणी पुरवठा विभागाने १९ लाखाचे पाणी बिल पाठवून ” झोपी गेलेले जागे झाले” याची प्रचिती दिली.

 299 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.