समाजसेवक अजय सावंत यांची कोरोनावर मात

लॉकडाऊनच्या काळात अजिंठा फाउंडेशनच्या माध्यमातून अजय सावंत यांनी सुमारे ५ हजार कुटुंबियांना अन्नधान्याची मदत केली

कल्याण : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अजिंठा फाउंडेशनच्या माध्यमांतून गोर गरीब नागरिकांना मदत करणाऱ्या समाजसेवक अजय सावंत यांनी कोरोनावर मात केली असून कोरोनावरील उपचार घेऊन पुर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. घरी परतल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी आणि आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांचे स्वागत करत कोरोनाला हरविल्याबद्दल कौतुक देखील केले आहे.
       कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाल्याने उपासमारीचे संकट नागरिकांवर कोसळले होते. यावेळी अजिंठा फाउंडेशनच्या माध्यमातून अजय सावंत यांनी सुमारे ५ हजार कुटुंबियांना अन्नधान्याची मदत केली आहे. हे मदतकार्य करतांना सावंत यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजताच अजय सावंत यांनी कल्याण मधील खाजगी रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले. या उपचारानंतर ते कोरोनावर मात करत पुन्हा आपल्या घरी परतले असून कोरोनाला हरवल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले.
       दरम्यान या काळात सर्व हितचिंतकांच्या आशीर्वादाने मला एकप्रकारे हा नवीन जन्म, नवीन आयुष्य मिळाले असून आणखी समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे. माझ्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर,  नर्स,  वॉर्डबॉय, स्टाफचे मना पासून आभार मानतो. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते सेवा देत होते. अनेक डॉक्टर स्टाफला कोरोना झाला तरी हिम्मत न  हरता सेवा देत राहिले त्यांचे करावे तितके कौतुक थोडे असल्याची प्रतिक्रिया यावेळी अजय सावंत यांनी दिली.

 616 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.