माहितीच्या अधिकारात मुंबई रेल्वे विकास मंडळ (MRVC) ची माहिती
ठाणे : गेल्या दहा वर्षांमध्ये चिखलोली परिसरातील लोकसंख्येत वाढ झाली आहे. शिवाय अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांच्या दिशेने नवनवी गृहसंकुले उभी राहत आहेत. या वाढत्या लोकसंख्येचा प्रवासी भार अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही स्थानकांवर भार पडू लागला आहे. याची दखल घेत सर्वांगातून होत असलेली मागणी आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा सततचा पाठपुरावा यामुळे मार्च – २०१९ रोजी मंजूर आणि भूमिपूजन झालेल्या चिखलोली स्थानकाचे काम आता प्रगतीपथावर आहे अशी माहिती आरटीआय अंतर्गत माहिती मुंबई रेल्वे विकास मंडळ (MRVC) ने दिली आहे. तसेच प्रस्तावित असलेल्या कल्याण बदलापूर रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी अखेर हालचालींना वेग आला आहे.आशा आहे लवकरच ह्ये दोन्ही प्रकल्प पूर्ण होऊन कल्याण कर्जत रेल्वे मार्गावरील सर्व रेल्वे प्रवाश्याना दिलासा भेटेल.
440 total views, 1 views today