महिलांसाठी शिलाई प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

ठाणे शहर (जि)काँग्रेस ओबीसी विभागातर्फे आयोजित करण्यात आला होता उपक्रम

ठाणे : कोरोनाच्या या परिस्थितीत बेरोजगारी चे प्रमाण वाढल्यामुळे ठाणे काँग्रेस ओबीसी विभाग व सुपरलॉन्स टेक्स्टाईल कंपनी तर्फे महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या वतीने ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन आनंद नगर घोडबंदर रोड येथे करण्यात आले होते.ठाणे काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल,महिला स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतील,नोकरीत प्राधान्य मिळेल.याबरोबरच शासनाच्या विवीध योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल.तसेच भविष्यात कोरोना काळानंतर समाजातील विविध घटकांसाठी शहरात अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील असे या वेळी बोलताना सांगितले.या उपक्रमास ठाणे शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व ठाणे काँग्रेस ओबीसी विभाग सरचिटणीस श्रीकांत गाडीलकर,ऍड उमेश सिंग,सागर लबडे,अर्चना सिंग,करणकुमार,मनोज कुमार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 374 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.