आपण माझ्यासाठी विठ्ठलाचे रूप आहात, जो दुर्बलांच्या दु:खात धावून जातो, तोच माझा विठ्ठल”


विवेक पंडित यांच्या भाऊक उद्गारानी  पोलीस अधिकार्‍या सह सर्वांचे डोळे पाणावले

ठाणे : लाॅकडाऊन काळात ठाण्याच्या वाघबीळ येथील अनाथ आश्रमातील  मुलींच्या जेवणाच्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. याबाबतची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर खैरनार यांच्याशी संपर्क साधला व या अडचणीची माहिती दिली. त्यावेळी खैरनार यांनी तात्काळ मुलींची पूर्ण जबाबदारी घेतली. त्यामुळे आज खैरनार यांचे आभार मानण्यासाठी पंडित यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात जाऊन खैरनार यांना विठ्ठलाची मूर्ती भेट घेऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी विवेक पंडित यांनी काढलेल्या भाऊक उद्गरांमुळे  पोलीस निरीक्षकांसह उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. याच वेळी ठाणे येथील वाघबीळ परिसरातल्या ‘जीवन संवर्धन फाउंडेशन’ संचालित ‘स्वर्गीय मालती गंध्रे मातृछाया गुरुकुल अनाथ आश्रमातील मुलींच्या जेवणाच्या व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र विविध संधी त्यांनी केलेल्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर खैरनार यांनी यांनी या अनाथालयातील सर्व मुलींच्या जेवणाची व्यवस्था केली आणि संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे  खैरनार यांचे आभार मानताना
“जो दुर्बलांच्या दु:खात धावून जातो, तोच माझा विठ्ठल, आपण माझ्यासाठी विठ्ठलाचे रूप आहात” असे भाऊक  उद्गार काढताच  वरिष्ठ पोलिस निरिक्षक खैरनार यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले.
विवेक पंडित यांनी या अनाथ आश्रमात जावून मुलींची आस्थेने विचारपूस केली, यावेळी मुलींनी सादर केलेल्या प्रार्थना ऐकल्या आणि मुलींसोबत  स्वत: एक गीत गाऊन घेतले. या वेळी खैरनार, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन्, सामाजिक कार्यकर्ते आणि हॉटेल व्यावसायिक तल्ला मुखी आणि फिरोज सिद्दिकी, श्रमजीवी संघटनेचे ठाणे तालुका अध्यक्ष रविंद्र गायकर, आत्माराम वाघे, नंदा वाघे, संघटनेचे हितचिंतक अशोक वखारे आदी मान्यवर उपस्थित होते.

 329 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.