पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना त्वरित अटक करा

युवासेनेचे पोलिसांना निवेदन , टीका करणाऱ्यांनो संयम सुटण्याची वाट बघू नका – कार्यकर्त्याचा इशारा

ठाणे : ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच महापौर नरेश म्हस्के याच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या संजय गोडबोले व अज्ञात व्यक्तीच्या विरोधात युवासेनेच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोपरी पाचपाखाडी विधानसभा मार्फत कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तसेच लवकरात लवकर पोस्ट करणाऱ्यांना अटक करा नाहीतरी आम्ही कायदा हातात घेऊ अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
गेल्या काही दिवसात ठाण्यात शिवसेना -मनसे असा वाद सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर रस्त्यावरचा वाद आता सोशल मीडियावर देखील तितक्याच प्रखरतेने पाहायला मिळत असून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चक्क मर्यादा ओलांडल्या आहेत. एकीकडे सोशल मीडियावर एकमेकांना शिवीगाळ सुरू असताना पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच महापौर नरेश म्हस्के यांच्यावर देखील टीका करण्यात आली आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांना या नेटकऱ्यांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान सदर व्यक्तींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कार्यवाही झाली नाही तर स्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना कोपरी पाचपाखाडी उप अधिकारी यज्ञेश एकनाथ भोईर यांचेमार्फत देण्यात आला. यावेळी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर, प्रतीक राणे ( विधानसभा समन्वयक), ऍड. शैलेश कदम ( आयटी सेल प्रमुख को.पा.), ह्रिषीकेश माने विधानसभा उप अधिकारी, शाखाप्रमुख संजय जाधव, नजीर खान, शिवाजी लाड, भूषण राणे, सदाशिव माने, निलेश रहाटे, देविदास घोडके, सुभाष चव्हाण, केतन शेळके, प्रथमेश घुडे, राहुल बांगर यांसोबत सर्व समस्त युवासैनिक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

65 total views, 1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *