पाटीदार भवनातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असणा-या महिला कोव्हिड योध्यांनी परिचारिकांनी तेथे ॲडमिट असलेल्या रुग्णांना राखी बांधून केले रक्षाबंधन
कल्याण : आज रक्षाबंधन, भाऊ बहिणीच्या नात्याचा एक मंगलमय दिवस. आजच्या दिवशी प्रत्येक बहिण आपल्या भाऊरायाला राखी बांधून त्याच्या दिर्घायुष्याची कामना करते. परंतू कोरोना साथीच्या आजच्या आपत्कालिन परिस्थितीत कोरोना बाधित असणारे अनेक जण रक्षाबंधनाच्या या पवित्र सोहळयापासून वंचित राहणार हे लक्षात येताच पाटीदार भवनातील कोव्हिड सेंटरमध्ये कार्यरत असणा-या महिला कोव्हिड योध्यांनी परिचारिकांनी तेथे ॲडमिट असलेल्या रुग्णांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण अनोख्या पध्दतीने साजरा केला.
आजच्या दिवशी रुग्णालयात दाखल असल्यामुळे बहिणीच्या भेटीपासून वंचित असलेले रुग्ण या सोहळयामुळे भारावून गेले. कोरोना विरुध्द लढायला आम्हाला आता पॉझिटीव्ह एनर्जी मिळाल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महापालिकेच्या टाटा आमंत्रा व साई निर्वाण येथील क्वारंटाईन सेंटर मध्ये देखील अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.
503 total views, 1 views today