डोंबिवलीतील अंबर केमिकल कंपनीत स्फोट

जीवितहानी नाही..भयभीत नागरिक उतरले रस्त्यावर

डोंबिवली : डोंबिवलीतील एमआयडीसी फेज-२ मधील अंबर केमिकल कंपनीतील रिऍक्टर स्फोटची घटना सोमवारी सायंकाळी साडे पाच वाजण्यास घडली. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील इमारतींना हादरा बसला तर स्फोट झालेल्या कंपनीच्या आजूबाजूच्या दोन ते तीन कंपनीच्या काचा फुटल्या.कंपनीत बंद असल्याचे सांगण्यात आले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
डोंबिवलीतील ही तिसरी घटना असून सोमवारी या घटनेने डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.भाजपचे पदाधिकारी दत्ता वाठोरे हे राहत असलेल्या इमारतीलाही हादरा बसल्याने रस्त्यावर उतरलेल्या भयभीत झालेल्या नागरिकांना धीर देण्यासाठी आले होते.तर भाजप नगरसेविका डॉ.सुनीता पाटील , डोंबिवली ग्रामिण मंडळ अध्यक्षा मनीषा राणे तसेच महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेस राज्य सचिव गायत्री सेन यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंबर केमिकल कंपनीच्या रिऍक्टरचा स्फोट झाला असून कंपनी बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.तर मनसेचे ओम लोके आणि शिवसेनेचे पदाधिकारी अमोल पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली.सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी या घटनेबाबत बोलताना शासनाने याकडे गांभीर्यने लक्ष देत चौकशी करावे अशी मागणी केली आहे.

 470 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.