निकेष खानविलकर, निकिता सालप यांची दिवा शहर अध्यक्षपदी नियुक्ती

भारतीय मराठा संघाच्या दिवा शहरातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

ठाणे : मराठा समाजाच्या विकासाकरिता अग्रेसर असणाऱ्या भारतीय मराठा संघाच्या दिवा शहर विभागातील पदाधिकाऱ्यांची संघाचे अध्यक्ष अविनाश पवार, उपाध्यक्ष दिपक पालांडे, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रदेश सचिव एस. डी. पाटील, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम यांच्या उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुरुषामध्ये निकेष खानविलकर तसेच महिलांमध्ये निकिता सालप यांची दिवा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
मराठा बंधू, भगीनी गाव पातलीतून शहर परिसरात आपल्या कुटुंबासमवेत उदरनिर्वाह करिता येऊन स्थायिक झाले आहेत. यामुळे इतरत्र विखुरलेला मराठा समाज एकत्र येणे आवश्यक असल्यामुळे दिवा शहरातील मराठा बंधु, भगीनी यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच एकजूट करण्याकरिता मराठा समाज एकत्र असणे आवश्यक आहे. यामुळे
भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार यांच्या आदेशानुसार रविवारी दिवा येथिल मराठा समाजाच्या कार्यालयात नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी पुरुष तसेच महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
पुरुषामध्ये निकेष खानविलकर तसेच महिलांमध्ये निकिता सालप यांची दिवा शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी शिवाजी पवार, योगेश राणे, सचिव तुषार पाटील, संघटक पदी अवधूत गोरुले, महेश आवडण, गणेश जाधव, मायापा पाटील, शिवाजी शेजवळ, संतोष शेजवळ, संतोष मोरे, आदित्य कदम, सचिन कालूगडे, संतोष पाटील, सल्लागार दिलीप लटके तसेच महिलांमध्ये उपाध्यक्ष पदी भावना गुरव, श्रावणी गावडे, सचिव योगिता शिंदे, संघटक माया रणवरे, लता पाटील, मयुरी सावंत, सरिता पाटील, अंजली पाटील, त्रिवेणी पाटील, अंकिता कदम, धनश्री साडुगडे यांनी नियुक्ती करण्यात आली. तसेच ठाणे महानगर संपर्क प्रमुख पदी अरुण फणसे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पदी रामचंद्र पवार, मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख पदी प्रकाश पाटील, पश्चिम मराठा उप संपर्क प्रमुख पदी अॅड. अमोल मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष अविनाश पवार, उपाध्यक्ष दिपक पालांडे, प्रदेश सचिव सदाशिव गारगोटे, प्रदेश सचिव एस. डी. पाटील, प्रसिद्धी प्रमुख अमोल कदम आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

 458 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.