रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनो दूध एल्गार आंदोलनात सहभागी व्हा



केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

मुंबई : शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये तर दुध पावडरला प्रति किलो पन्नास रुपये अनुदान मिळावे आणि राज्य शासनाने  दूध प्रतिलिटर ३० रुपये दराने खरेदी करावे  यासाठी महायुतीच्या वतीने  १ ऑगस्ट रोजी  दूध एल्गार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. महायुतीतील घटक पक्ष या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंदोलनात कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य माणसाला मदत करणे, किंवा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम यापूर्वी रिपाइंने रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली केलेले आहे. सध्याच्या काळात दूध व्यवसायात शेतकरी मेटाकुटीला आला आहे. २० ते २५ रुपये प्रतिलिटर मिळणारा बाजारभावाचा  खर्च देखील फिटत नसल्याने दूध व्यवसाय तोट्यात चालला आहे. महाराष्ट्रात गायीचे दूध १.१० कोटी लिटर, म्हशीचे २० लाख लिटर व इतर लूज दुध १० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. राज्यात गाय व म्हैस यांचे एकूण १.४० कोटी लिटर दूध उत्पादन होते. ३५% खरेदी ही सरकार व शासनाच्या माध्यमातून होते. ६५% खरेदी खासगी उद्योजक करतात. बंद दुधाची पिशवी विक्री ६० लाख लिटर लूज व बायप्रोडक्शन २९ लाख लिटर तर दूध भुकटीसाठी ६० लाख लिटरच्या आसपास लागते. मात्र सध्या २० ते २५ रुपये प्रतिलीटर भाव मिळत आहे. या न परवडणार्‍या बाजारभावमुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी या आंदोलनात भारतीय जनता पक्ष, पब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम पक्ष, रासप;  भारतीय जनता किसान मोर्चा, रयत क्रांती संघटना व इतर शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. या आंदोलनात रामदास आठवले यांच्या आदेशाने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे  कार्यकर्ते सामील होणार आहेत.

 440 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.