मनुष्य मन माणुसकी ह्या सेवाभावी संस्थेतर्फे सामाजिक कार्य सुरूच

लॉक डाऊन काळात वाहतुकीची फारशी व्यवस्था नसतानाही अनेकांना दिला मदतीचा हात

कल्याण : गेली ५ वर्षे निरंतर आदिवासी पाडा,अंध वस्ती ,जिल्हा परिषद शाळा ,वृद्धाश्रम आदी क्षेत्रात या संस्थेचे कार्य सुरू असते. लॉक डाऊन काळात ट्रेन्स बंद असल्याने मुंबई व आसपासच्या भागातील त्यांचे सदस्य नेहमीप्रमाणे एकत्र येऊ काम करू शकत नव्हते ,तरीसुद्धा काही सदस्यांनी एकत्र येऊन अनेक कुटुंबाना दीड ते दोन महिने पुरेल एवढा धान्यसाठा संस्थेतर्फे नेऊन दिला.
कालच न्यू पनवेल माथेरान रस्त्यावरील रिटघर ह्या आदिवासी पाड्यात जाऊन तेथील सर्वच्या सर्व ३० कुटुंबाना धान्य नेऊन दिले.
सोबत १ सॅनिटायझर बाटली ,मास्क ,ग्लोव्हज ह्याचेही ह्यावेळी वाटप केले. योग्य वेळी मदत मिळाल्याने ते सर्व आदिवासी बंधू आनंदी झाले.हे सर्वजण विटभट्टीवर काम करत असतात व पावसाळ्यात विटभट्ट्या बंद असल्याने त्यांची उपासमार होत असते. संस्थेतर्फे विजय देशमुख ,शैलजा सलागरे व दक्षता ह्यांनी ह्यासाठी मेहनत घेतली.
तसेच बदलापूरच्या जवळचे काही गरीब कुटुंबे ह्यांना संस्थेतर्फे संगीता चित्रे ह्यांनी धान्य नेऊन दिले तर डोंबिवली स्फोटातील पोळ कुटुंबीय,भिवपुरी येथील अंध पगारे व नगरकर कुटुंबे ह्यांना त्यांच्या घरी जाऊन संस्थेतर्फे विजय देशमुख व दक्षता ह्यांनी धान्य नेऊन दिले .
संस्थेतर्फे वांगणी येथील संस्था काम करीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील १० वी च्या गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार पुढील आठवड्यात त्यांच्या घरी जाऊन करण्यात येईल , ह्यात विशाल राठोड हा अंध विदयार्थी असून बाकीच्या मुलांपैकी बऱ्याच जणांचे पालक अंध आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष विजय देशमुख ह्यांनी सांगितले.

 572 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.