योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेचा निकाल १०० टक्के

शाळेच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा क्लास किंवा शिकवणी नसताना शिक्षकांचे संपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यावर घवघवीत यश प्राप्त केले आहे

बदलापूर :  बदलापूर येथील योगी श्री अरविंद गुरुकुल शाळेचा शालांत प्रमाणपत्र परीक्षा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेच्या  विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा क्लास किंवा शिकवणी नसताना शिक्षकांचे संपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यावर घवघवीत यश प्राप्त केले आहे.
  उत्तीर्ण झालेले सगळे विद्यार्थी जानेवारी महिन्यापर्यंत शाळेच्या सर्व उपक्रमात सहभागी होऊन, क्रीडास्पर्धा, छंद अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या गायन, भरतनाट्यम, नृत्य, तबलावादन अशा परीक्षा देऊन छंद जोपासला आहे. बर्‍याच विद्यार्थ्यांनी चित्रकलेचा ग्रेड परीक्षा देऊन प्राविण्य मिळवले आहे. याखेरीज प्रथम आलेले विद्यार्थी हे वक्तृत्व, कवी, लेखक अशी लेखन कल्पकता-कला जोपासणारे आहेत. नेटबॉल या क्रीडास्पर्धेत काही विद्यार्थी विभाग स्तरापर्यंत तर काही विद्यार्थी राज्यस्तरापर्यत खेळाडू म्हणून सहभागी होऊन विजयी झाले आहेत.
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कला, क्रीडा, योगासने कुशलता, कवी, लेखक, सूत्रसंचलन कौशल्य, चित्रकला, गायन, तबलावादन, नृत्य अशा कोणत्या ना कोणत्या कलेत निपूण आहेत.

बहुविकलांग असलेला असीम देवधर या विद्यार्थ्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असूनही ६७ टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले आहे.
अथर्व पानवलकर ९६.२० टक्के आणि फाल्गुनी बुधवंत ९६.२० टक्के दोघेही प्रथम. द्वितीय – गौरी कंगले -९५ टक्के, तृतीय- कनिका आणचेकर – ९३.८० टक्के, चतुर्थ – साहिल डुंबरे ९०.८० टक्के, पाचवा- मनस्वी पवार -९०.६० टक्के.

 900 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.