नवी मुंबईतील अत्याधुनिक कोविड१९ विषाणू चाचणी व निदान प्रयोगशाळेचे लोकार्पण

प्लाझ्मा दान संदर्भात जनजागृती कार्यक्रमास आजपासून सुरूवात

नवी मुंबई : नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालय येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कोविड१९ विषाणू चाचणी व निदान ( #RtPCR ) प्रयोगशाळेचा शुभारंभ सोहळा आज संपन्न झाला. या केंद्रामार्फत दिवसाला १ हजार तपासण्या करण्यात येणार असून यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर लवकरात लवकर योग्य उपचार करण्यात येतील.
नवी मुंबई महापालिका व अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अपोलो हॉस्पिटल येथे प्लाझ्मा दान जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याचा शुभारंभ आज संपन्न झाला.
याप्रसंगी खासदार राजन विचारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, शिवसेना उपनेते विजय नहाटा, नवी मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, काँग्रेस प्रवक्ता रवींद्र सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष शेट्टी, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सविता रामरखियानी आदी मान्यवर उपस्थित होते.

 454 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.