डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवरील पादचारी पुलाला ३० ऑगस्टचा मुहूर्त

नव्याने बांधण्यात येत असलेल्या डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर उड्डाण पुलाची सर्व कामे वेळेत पूर्ण करुन हा पूल नोव्हेंबर २०२० अखेर पर्यंत वाहतुकीकरिता खुला करण्याचे उद्दिष्ट

 
दोन्ही पुलांच्या कामाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली पाहणी.
 
डोंबिवली : डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा आणि येथील नागरिकांना रहदारीकरिता अत्यंत महत्वाचा असलेल्या रेल्वेवरील नविन कोपर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु असून आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केली. याप्रसंगी महापौर विनिता राणे, आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती आणि नगरसेवक श्री. दिपेश म्हात्रे, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, नगरसेवक विश्वनाथ राणे उपस्थित होते.
या उड्डाण पुलाच्या परिसरातून जात असलेल्या विद्युतवाहिन्यांचे पुश-थ्रू च्या माध्यमातून भूमिगत करण्याचे काम सुरु असून महिन्याभरात हे काम पूर्ण होईल. तसेच या उड्डाण पुलाच्या दोन पिलर उभारण्याचे काम सुरु असून या पुलाच्या गर्डरचे काम अहमदाबाद येथील कारखान्यात वेगाने सुरु आहे. पुलाची सर्व कामे वेळेत पूर्ण करुन हा पूल नोव्हेंबर २०२० अखेर पर्यंत वाहतुकीकरिता खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
डोंबिवली पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या कल्याण दिशेकडील रेल्वेवरील पादचारी पुलाची देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी पाहणी करत आढावा घेतला. डोंबिवली रेल्वे स्थानकातील सर्व प्लॅटफॉर्मना जोडत पूर्व – पश्चिमेला ये-जा करण्यासाठी नागरिकांसाठी महत्वाचा असलेल्या या पादचारी पुलाचे काम कोरोना संकंटकाळात देशभरात तसेच राज्यभरात लॉकडाऊन जाहीर केला असताना शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत सुरु केले होते. आता पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून ३० ऑगस्ट पर्यंत हा पूल नागरिकांकरिता खुला करण्यात येणार आहे.

 373 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.