पाच शाळांचा शंभर टक्के निकाल
डोंबिवली : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर, अरुणोदय, रामचंद्रनगर मराठी माध्यम, रामचंद्रनगर इंग्रजी माध्यम तसेच आदिवासी आश्रम शाळा या शाळांचा दहावीचा निकाल १००% तर दत्तनगर ९६.९८ %,गोपाळ नगर शाळेचा निकाल ९५.१६% लागला आहे.
संस्थेच्या सर्व शाखांमधून प्रथम तीन क्रमांक अथर्व सुनील जगताप ९७.२० %, प्रथम क्रमांक ( अरुणोदय ) नेत्रा प्रमोद फलटणकर ९७.०० %, द्वितीय क्रमांक (अरुणोदय), वैष्णवी आनंदा पाटील आण लोचना नरेंद्र लोखंडे यांनी ९६.२०% गुण मिळवीत तृतीय क्रमांक (विष्णुनगर) मिळविला. त्याचबरोबर संस्थेच्या शहापूर येथील स्वामी विवेकानंद आदिवासी आश्रमशाळा, चिंध्याची वाडी मधील पहिल्या तीन मुलांची नावे -रमेश शिवाजी आगिवले ८१.०० % (प्रथम क्रमांक), विजय जानु गावंडा ७८.६० % (द्वितीय क्रमांक), प्रकाश बुध्या भला ७७.२० %(तृतीय क्रमांक) मिळविला.शहापूर येथील आदिवासी भागामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय आश्रम शाळेमार्फत होत आहे. घरातील वातावरण नसताना,पालकांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश गौरवास्पद आहे.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे, कार्यवाह डॉक्टर दीपक कुलकर्णी तसेच संस्था पदाधिकऱ्यांनीही कौतुक केले असून विद्यार्थ्यांचे पालक, शाळांचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे संस्थेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
469 total views, 2 views today