इमारतीत पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या मोहन रावल यांच्या मुलाने ९२.८० टक्के गुण मिळवत मिळवला प्रथम क्रमांक
कल्याण : पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक विद्यालय सातत्याने विद्यार्थ्यांकरीता विविध कार्यक्रम राबवित असते सोबतच शैक्षणिक गुणवत्तेकडे ही लक्ष दिले जाते सतत अकराव्या वर्षी शाळेचा शंभर टक्के निकाल लावून शंभर टक्के निकालाची परंपरा टिकवून ठेवली यंदा एकूण ७७ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसली होती ४४ विद्यार्थी विशेष प्रावीण्य व २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून इतर विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी प्राप्त झाली इमारतीत पाणी सोडण्याचे काम करणारे मोहन रावल यांचा मुलगा चेतन मोहन रावल या विद्यार्थ्याने ९२.८० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक मिळवला व अक्षदा अरुण सानप या विद्यार्थिनीने ९१.८० टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तसेच माधुरी हेमराज सहारे या विद्यार्थिनीने ९१.२० टक्के मिळवून तृतिय क्रमांक मिळवला. अभ्यासात अप्रगत विद्यार्थ्यांना शिक्षक दत्तक घेतात व शाळेच्या व्यतिरिक्त जास्तीचा वेळ देऊन विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतात म्हणुन शिक्षकांचे प्रयत्न आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे शाळेचा निकाल १००% लागतो या शैक्षणिक वर्षी ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी प्रतिसाद देत नाही शाळा कधी सुरू होतील माहीत नाही परंतु शाळा सुरू झाल्यावर शाळेव्यतिरिक्त जास्तीचा वेळ देऊन गुणवत्ता वाढवावी लागणार आहे असे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दूरी ठेवून विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला संस्था अध्यक्ष पी टी धनविजय शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी गणेश पाटील ,ओमप्रकाश धनविजय, संगीता महाजन ,नयना वाबळे, शोभा देशमुख, माधुरी काळे, उर्मिला साबळे व नाजुका पवार या शिक्षकांचे विशेष कौतुक करून विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले
798 total views, 1 views today