नवी मुंबईत मनसेकडून वाढीव वीज बिलांची होळी

सरकारच्या विरोधात मनसेकडून संताप व्यक्त

नवी मुंबई : सध्या महाराष्ट्रातील तसेच नवी मुंबईतील जनतेला भेडसावत असलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्दयावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झालेली बुधवारी पहायला मिळाली आहे. मनसेच्या नवी मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाबाहेर मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीने ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलांची होळी करत आपला संताप व्यक्त केला.
महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा घराच्या गॅलरीत, सोसायटीच्या आवारात तसेच व्यापाऱ्यांनी दुकाना बाहेरील मोकळ्या जागेत वाढीव वीज बिलांची होळी करून आपला निषेध नोंदवावा. #वीजबिल_जाळा #BurnTheBill हे हॅशटॅग वापरून याचा व्हिडीओ जनतेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (cm@maharashtra.gov.in) तसेच ऊर्जामंत्री नितिन राऊत यांना (dr.nitinraut09@gmail.com) आपले विडिओ पाठवावा तसेच सोशल मीडियावर जास्तीत जास्त शेअर करून मनसेने पुकारलेल्या जन आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी यावेळी केले आहे.

 528 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.