कल्याणमधील रुग्णालयात इंजेक्शनचा काळाबाजार

मनसेची पालिकेसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

कल्याण : कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणारी महागडी इंजेक्शन  रुग्णालयाखाली असलेल्या मेडिकल मधून दुप्पट किमतीत विकत देण्यात आली मात्र ही इंजेक्शन दिल्यानंतरही रुग्णाचा मृत्यू झाल्याने  याप्रकरणी संशय व्यक्त करत डॉक्टर आणि रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकसह मनसे पदाधिकाऱ्यांनी सबंधित डॉक्टर आणि मेडीकल चालकावर गुन्हा दाखल करत कठोर कारवाईची  मागणी करत याबाबत पालिका प्रशासनासह  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
कल्याणच्या काळा तलाव परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला २१ जुलै रोजी कल्याण पश्चिमेच्या शिवम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोवीड चाचणीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी सीटी स्कॅनमध्ये त्यांना संसर्ग झाल्याचे सांगत शिवम हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना ऍडमिट केले तर दुसऱ्या दिवशी सकाळी रुग्णाची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याचे सांगून त्यांना २ इंजेक्शन आणण्यास सांगितले. रुग्णालयाच्या इमारतीत असलेल्या मेडीकलमध्ये उपलब्ध असलेली ही इंजेक्शन छापील किमतीपेक्षा दुप्पट किंमतीत म्हणजेच १ लाख २० हजार रुपयांना खरेदी केल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले.  त्यानंतर आणखी २ इंजेक्शन आपल्याकडून मागून घेतली मात्र ती रुग्णाला देण्यात आली किंवा नाही याबाबतही नातेवाईकांनी संशय व्यक्त करत संबंधित डॉक्टर आणि मेडीकल चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी मनविसेचे शहर अध्यक्ष विनोद केणे यांनी आणि मृताच्या नातेवाईकांनी पालिका प्रशासनासह मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
  तर पालिकेच्या साथ रोग नियंत्रण अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी या प्रकरणाची तक्रार अर्ज प्राप्त  झाला असून आरोग्य विभागाच्या कमिटी कडुन याबाबत चौकशी सुरू असून या कमिटीचा अहवाल जसा प्राप्त होईल त्यानुसार कारवाई केली जाईल असे सांगीतले
तर याबाबत रुग्णालयातील डॉ तांबोळी यांनी मात्र हॉस्पिटल सुरू आहे,  बंद करण्यात आलेले नाही. मात्र आम्ही करोना रुग्णालय बंद केलं. उपचारासाठी लागणारी औषधे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही करोना उपचार आमच्या रुग्णालयातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आतापर्यत प्रामाणिकपणे रुग्णावर उपचार केले असून करण्यात आलेले आरोप निरर्थक असल्याचे सांगितले.

 453 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.