वाढीव वीज बिलाविरोधात मनसे उभारणार जनआंदोलन

मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे : ज्या नागरिकांना वाढीव बिल आले आहेत अशा नागरिकांनी avinashjadhavmns@gmail.com या मेल आयडिवर वीज
बिल पाठवायचे आहे. ज्यांना मेल करणे शक्य नाही त्यांनी मनसेचे विष्णू नगर येथे असणाऱ्या मध्यवर्ती कार्यालयात बिलाची झेरॉक्स प्रत जमा करण्याचे आवाहन मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे नेते अभिजित पानसे यांनी केले आहे.
राज्यासह ठाण्यातील अनेक नागरिकांना वाढीव वीजबिल आले असून ही वाढीव वीज बिलं सरकारने माफ करावीत यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आक्रमक झाली आहे. कोरोनामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे सुरक्षिततेच्या दृष्टीने हिताचे ठरणार नसल्याने मनसे ठाणे शहरात आगळेवेगळे जन आंदोलन करणार आहे. या संदर्भात आज मध्यवर्ती कार्यालयातून त्यांनी जन आंदोलनाची माहिती दिली आणि या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन देखील केले.
कोरोनाच्या महामारीत नागरिकांचे नोकरी व्यवसायावर गदा आलेली असताना सरकारने वाढीव बिल आकारणी करून जनतेची चेष्टा सुरू केली आहे. ही बिले माफ करावी यासाठी मनसेच्या माध्यमातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी महावितरण कार्यालयात धडक भेटी देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारले. मात्र कोणत्याही प्रकारची समाधान कारण उत्तर मिळत नसल्याने मनसेने सध्याची राज्याची आणि विशेषतः ठाण्याची कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नेहमीच्या आक्रमक पद्धतीने खळखट्याक आंदोलन न करता जनतेच्या माध्यमातून ‘मेल’ आंदोलन छेडले आहे. या आंदोलनात नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आवाहन केले आहे.

 372 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.