पालिकेची रुग्णालये तातडीने सुसज्जित करा

मनसेची राज्य सचिव इरफान शेख यांनी दिलेआयुक्तांना पत्र

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय आणि डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय तातडीने सुसज्जीत करण्याची मागणी मनसेने केली असून याबाबत मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.
       कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्यावत यंत्रणेचा अभाव आहे. पालिकेचे रुग्णालय असलेल्या कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालय व डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालय याठिकाणी पुरेशा सुविधा नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे हे रुग्णालये अद्यावत करण्यासाठी येथील केंद्राचे आरोग्य सेवेचे काम १५ दिवसा साठी थांबवून तात्काळ सुसज्जीत करण्यात यावे. कल्याणला आसरा केंद्रात व डोंबिवलीत पाटीदार भवन येथे तेथील रुग्ण हलवावे. आणि ही दोन्ही रुग्णालय युद्ध पातळीवर तातडीने सुसज्जीत करून घ्यावी अशी मागणी इरफान शेख यांनी केली आहे.  
तात्पुरत्या केंद्रांवर लाखो रुपये खर्च करतोय. पण आपली हक्काची ही रुग्णालय सेवेसाठी सक्षम होण्यापासून वंचित आहेत. तात्पुरत्या केंद्रा वर खर्च करणे आणि त्याचा सलग स्थायी वापर भविष्यात अशक्य आहे. आपल्या हक्काच्या इमारती वापरून तातडीने सुसज्जीत करणे हे भविष्यात ही फायदेशीर ठरणार असून याबबत तत्परतेने निर्णय घेऊन अमलबजावणी करण्याची मागणी मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. 

 429 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.