१०८ रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अतिगंभीर रुग्णाचे जीव धोक्यात
रुग्णवाहिका वारंवार नादुरुस्त होत असल्याची वरिष्ठांकडे नोंदवली तक्रार
शहापूर : शहापूर तालुक्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असून,त्यात अतिगंभीर रुग्ण जास्त प्रमाणात मिळत असल्याने त्या रुग्णांना शहापूर येथून पुढील अत्यावश्यक उपचार करण्यासाठी ठाणे व कल्याण येथील रुग्णालयात हलविण्यासाठी १०८रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होत नसून तालुक्यातील रुग्ण वाहिका वारंवार नादुरुस्त अवस्थेत असल्याची तक्रार शहापुरच्या कोविड सेंटरचे प्रमुख व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोहर बनसोडे यांनी १०८-च्या व्यवस्थापक,जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली असून सुस्थितीत असणाऱ्या १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
शहापूर येथील कोविड सेंटर शिवाजीराव जोंधळे कॉलेज येथे सुरु असून या सेंटरसाठी कोविङ -१९ च्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांअंतर्गत १०८ रुग्णवाहिका सेवा येते . सदर सेंटरमध्ये दाखल रुग्ण अतिगंभीर झाल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी संदर्भात करण्यांत येते त्यावेळेस या अतिगंभीर रुग्णांना १०८ रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध होत नाहीत . तसेच या तालूक्यातील डोळखांब , कसारा , खर्डी येथील १०८ रुग्णवाहिका नेहमी नादुरुस्त असतात , बरेच वेळा फोन करुनही त्या उपलब्ध होत नाही , उपलब्ध झाली तर डॉक्टर नसतात , रुग्णवाहिकेत इमर्जन्सी किट , ऑक्सीजन सिलेंडर नसते , त्यामुळे अतिगंभीर रुग्णांचे भर रस्त्यात संदर्भात रुग्ण रुग्णालयांत पोहोचायच्या अगोदर मृत्यू पावतात , १०८ रुग्णवाहिकेबाबत वारंवार तक्रारी करुनही कोणीही दखल घेत नाहीत. इमर्जन्सी किटमध्ये – ओ टू सिलेंडर , मॉनीटर , इटिटि , लॅरिगोस्कोप , इमर्जन्सी औषधी यांचा अभाव असून ,१०८ रुग्णवाहिका इच्छित स्थळी उशिरा येत असून डॉक्टर अप्रशिक्षित असल्याने अतिगंभीर रुग्णाच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे
424 total views, 1 views today