वीज बिलाची माफी आणि वाढलेले दर रद्द करण्याची भाजपची मागणी
वीजवितरण कार्यालयावर मोर्चा
डोंबिवली : माजी राज्यमंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण व कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कल्याण जिल्ह्याच्या व भारतीय जनता पार्टी मंडलाच्या वतीने डोंबिवली पूर्वकडील बाजीप्रभू चौक येथील महाराष्ट्र विद्युत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.त्यावेळी आमदार चव्हाण यांना दिलेल्या आश्वासनांची कुठलीही पूर्तता व कार्यवाही झाली नाही. म्हणून भारतीय जनता पार्टी, डोंबिवली पश्चिम मंडळाने महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी ,मुख्य अभियंता कार्यालय डोंबिवली पश्चिम येथील आनंदनगर भागातील विद्युत बिलांची माफी व वाढवलेले दर रद्द करण्याबाबत, विजग्राहक नागरिकांसाठी केलेल्या मागण्यांचे स्मरण करून देण्यात आले.त्या संदर्भात मुख्य अभियंता उके यांना स्मरणपत्र देण्यात आले व १५ ऑगस्टपर्यंत सदर विषयांवर कार्यवाही न झाल्यास पुन्हा मोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आले.सदर शिष्टमंडळात मंडल अध्यक्ष प्रदिप चौधरी,नगरसेविका व महिला मोर्चा अध्यक्षा तथा नगरसेविकाविद्या म्हात्रे, कल्याण जिल्हा सचिव राजेश म्हात्रे, मंडल सरचिटणीस समिर चिटणीस,शहर सचिव हरीष जावकर,शहर सचिव मनिष शिंदे,शहर उपाध्यक्ष सुजीत महाजन, युवा मोर्चा उपाध्यक्ष, निलेश परब, पवन पाटील, सुरेश जोशी, सुनिल शुक्ला, अमोल दामले, हर्षदजी सुर्वे, शरद ठाकरे, अंकुश किंजळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
443 total views, 5 views today