डोंबिवलीत रक्तदान शिबीर संपन्न

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते शिबिर

डोंबिवली : शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा क्र. ७२ पेंडसेनगर आणि चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड बँक डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवलीशहरप्रमुख राजेश मोरे, शिर्डी नेवासा संपर्कप्रमुख प्रकाश तेलगोटे, ग्राहक संरक्षण कक्षाचे भाई पानवडीकर, पेंडसेनगर शाखाप्रमुख प्रसाद चव्हाण महिला कार्यकर्त्या वंदना जाधव या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिर पार पडले.डोंबिवली शहरातील अनेक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.या शिबिरात मंगेश शिंदे या अपंग तरुणाने व्हील चेअरवर बसून रक्तदान केले आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

 384 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.