निविया इंडियाने नोंदवला पहिला व्‍हर्च्‍युअल गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड

देशाच्‍या विविध भागांमधील १०० हून अधिक पुरूषांचा सहभाग असलेल्‍या लाइव्‍ह स्ट्रिमच्‍या माध्‍यमातून २३ जुलै रोजी हा रेकॉर्ड स्‍थापित करण्‍यात आला.


मुंबई : निविया मेन या पुरूष ग्रुमिंग ब्रॅण्‍डने नवीन व अनोख्‍या व्‍हर्च्‍युअल गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डसह त्‍यांच्‍या तु-यामध्‍ये आणखी एका पंखाची भर केली आहे. नवीनच सादर करण्‍यात आलेल्‍या निविया मेन अॅक्‍ने फेसवॉशसह १०० हून अधिक भारतीय पुरूषांनी सहभाग घेतलेल्‍या लाइव्‍ह स्ट्रिमवरील ”दि मोस्‍ट पीपल वॉशिंग देअर फेस सायमल्‍टेनिअसली फॉर ए मिनट” यासाठी रेकॉर्ड स्‍थापित करण्‍यात आला. सध्‍याच्‍या जागतिक महामारी दरम्‍यान स्‍वच्‍छतेला अधिक महत्त्व दिले जात आहे. सहभागींनी उत्‍साहाने आव्‍हान स्विकारले आणि एका मिनिटासाठी त्‍यांचा चेहरा स्‍वच्‍छ धुवत स्किनकेअर ब्रॅण्‍डसाठी नवीन व्‍हर्च्‍युअल गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड स्‍थापित केला. या रेकॉर्डचा आणखी एक अद्वितीय पैलू म्‍हणजे सहभागी देशभरातील पुरूष होते आणि त्‍यांना या आव्‍हानामध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी आमंत्रित करण्‍यात आले. रेकॉर्ड पाहण्‍यासाठी उपस्थित असलेल्या निवडक मीडिया आणि गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्ड परीक्षकांचा समावेश असलेल्‍या या लाइव्‍ह ऑनलाइन उपक्रमाला ऑनलाइन समुदायाकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
या नवीन उत्‍पादनाबाबत बोलताना निविया इंडियाचे विपणन संचालक सचिन किल्‍लावाला म्‍हणाले, ”आम्‍हाला गिनीज वर्ल्‍ड रेकॉर्डसकडून हे प्रमाणन मिळण्‍याचा आनंद झाला आहे. ही जागतिक मान्‍यता निविया मेनच्‍या पुरूषांना सुलभपणे व जलदपणे त्‍वचेची काळजी घेण्‍याची सुविधा देण्‍याच्‍या मिशनप्रती आमच्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ करते. विशेषत: सध्‍याच्‍या अनपेक्षित काळात मिळालेल्‍या या यशामधून निदर्शनास येते की, सर्वोत्तम स्किनकेअर उत्‍पादनांसह आमच्‍या प्रेक्षकांना आनंदी करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये आम्‍हाला कोणत्‍याच गोष्‍टीचा अडथळा येऊ शकत नाही.”

 424 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.