‘२६ जुलै मुंबई’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

२६ जुलै २००५ च्या महापुरावर येतोय मराठी चित्रपट

बदलापूर : “एक होतं माळीण” या नैसर्गिक आपत्तीवर आधारीत चित्रपटानंतर लेखक व दिग्दर्शक राजू राणे यांनी त्यांच्या दुसऱ्या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा केली. “२६ जुलै मुंबई” असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटाचे प्रिंट तसेच मोशन पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार तसेच ‘आहुति’चे संपादक गिरीश त्रिवेदी, झी २४ तास चे पत्रकार चंद्रशेखर भुयार आणि ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचे निर्माते संतोष म्हात्रे यांच्या हस्ते हे पोस्टर लॉन्च करण्यात आले. राजू राणे यांच्या बेलवली येथील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
२६ जुलै २००५ साली आलेल्या पाहापुराला १५ वर्ष पूर्ण झाले आहेत. तो दिवस मुंबईकरांच्या आयुष्यातील एक काळा कुटट दिवस ठरला होता. अजूनही त्या दिवसाच्या आठवणी मुंबईकरांच्या मनात घर करून आहेत. मुंबई आणि उपनगरात आलेल्या याच महप्रलयावर मराठी चित्रपट येतोय. “२६ जुलै मुंबई” या नावाच्या मराठी चित्रपटाची घोषणा बदलापूरच्या राजू राणे या तरुण दिग्दर्शकाने केली आहे. या चित्रपटाचे लेखन राजू राणे यांनी केले आहे. ‘२६ जुलै मुंबई ‘ या चित्रपटाच प्रिंट पोस्टर सोबतच त्याचं वास्तविकता दर्शविणारं मोशन पोस्टर सुद्धा २६ जुलैचे औचित्य साधून लॉच करण्यात आले. २६ जुलै २००५ या दिवशी मुंबई आणि उपनगरातील घडलेला संपूर्ण महापुराचा थरार या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञ काम करणार आहेत परंतु यांची नावे अजुनही गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटाच प्रि प्रोडक्शनच काम शेवटच्या टप्यात असुन लवकरच त्याच्या चित्रिकरणास सुरूवात होणार आहे .“एक होतं माळीण” या नैसर्गिक सत्य घटनेवर आधारित चित्रपटानंतर आता लेखक आणि दिग्दर्शक राजु राणे यांचा याच शैलीतला हा दुसरा चित्रपट आहे.
लेखक, दिग्दर्शक राजू राणे हे मूळचे बदलापूरचे रहिवाशी असून त्यांचा हा दुसरा मराठी चित्रपट आहे. अनेक नैसर्गिक तसेच आर्थिक समस्यांचा सामना करून देखील मराठी चित्रपटसृष्टीत काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास घेऊन राजू राणे पुढे वाटचाल करत आहेत. “एक होतं माळीण” या चित्रपटाचे चित्रीकरण बदलापूर जवळ करण्यात आले होते.चित्रपट पाहिल्यावर वाटणार नाही कि हे चित्रीकरण बदलापूर मध्ये झाले आहे. इतके वास्तव चित्रीकरण करण्यात आले असल्याचे राजू राणे यांनी सांगितले. त्यासाठी सर्व टीमने प्रचंड मेहनत घेतली म्हणून हे यश मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी आम्ही माळीण गावात जाऊन पूर्ण सविस्तर माहिती घेतली होती असे राजू राणे म्हणाले. कोरोनाची टाळेबंदी उठल्यावर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे राजू राणे यांनी सांगितले. विशेष म्हणजे “२६ जुलै मुंबई” या चित्रपटाचे चित्रीकरणही बदलापूर जवळच करण्यात येणार असल्याचे राजू राणे यांनी सांगितले. राजू राणे आणि निर्माते संतोष म्हात्रे हे दोघेही बदलापूरचेच असून त्यांचे बहुतेक साथीदार हे बदलापूर परिसरातीलच आहेत. चित्रपटांचे चित्रीकरण बदलापूर आणि आसपासच्या परिसरात होत असल्याने बदलापूरचे नाव जगभर होईल.

 1,479 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *