आधारवाडी जेलमधून २ आरोपी फरार

खडकपाडा पोलिसांकडून शोध सुरु
कल्याण : आधारवाडी जेल मधून कैद्यांचे पलायन सत्र सुरूच असून आज चोरीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या २ आरोपींनी आधारवाडी जेलमधून पलायन केल्याचा प्रकार समोर आला आहे. अविनाश गायकवाड आणि श्याम चव्हाण अशी या दोघा आरोपींची नावे आहेत.
शाम चव्हाणवर भिवंडी, शांतीनगर आणि कोनगाव पोलीस ठाण्यामध्ये तर अविनाश गायकवाडवर कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आज पहाटे पावणे पाचच्या सुमारास जेलमधील मुलाखत कक्षाच्या वरून चादरीच्या साहाय्याने उडी मारून या दोघांनी पलायन केल्याची प्रथमिक माहिती आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खडकपाडा पोलीस दोघांचाही शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक पवार यांनी दिली.

 605 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.