दिव्यांग क्रिडा असोसिएशन ठाणे, युवा संस्था व राष्ट्रिय अपंग विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला उपक्रम
कल्याण : दिव्यांग क्रिडा असोसिएशन ठाणे, युवा संस्था व राष्ट्रिय अपंग विकास महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी टिटवाळा आणि कल्याण येथे २५ दिव्यांग खेळाडु तसेच १२५ दिव्यांग यांना प्रत्येकी १ अन्नधान्य कीट त्यात (१० किलो बासमती तांदूळ, १०किलो गव्हाचे पीठ, २ किलो तेल, मीठ,तिखट हळद,मसाला ३ किलो तुरडाळ, कपड्याचे साबण अंगाचे साबण) इत्यादी आवश्यक वस्तूंची मदत केली.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सचिव संजय जगता यांनी दिव्यांग खेळाडूंना भविष्यामध्ये युवा संस्था द्वारे मदत करण्याची घोषणा केली. यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ सहसचिव विशाखा चव्हाण, दिव्यांग क्रिडा असोसिएशन ठाणेचे सचिव कल्पेश गायकर, दिव्यांग क्रिडा असोसिएशन ठाणेचे सदस्य जितेंद फाकटकर, नागेश खंडागळे, नितीन घोडे, दिनेश कटोडीया, दिपक पाटील, विशाल पोयरेकर, नरेश सापरा, ईमरान शेख, जगदिश चौधरी आदिजण यावेळी उपस्थित होते.
636 total views, 2 views today