वंचित बहुजन आघाडीची मागणी
डोंबिवली : डोंबिवली शहरात विद्यार्थ्याची संख्या जास्त असून त्यासाठी दाखल्यासाठी त्यांना डोंबिवली पश्चिमेकडील पु. भा. भावे सभागृहातील सेतू सुविधा कार्यालयात जावे लागते. मात्र लॉकडाऊन मध्ये सेतू कार्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना दाखले मिळणे कठीण झाले आहे.नुकताच १२ विचा निकाल जाहीर झाला आहे.लवकरच १० विचाहि निकाल लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कल्याण येथील सेतू सुविधा केंद्रात जावे लागते.विद्यार्थ्याना होत असलेल्या त्रासाबाबत वंचित बहुजन आघाडीने तहसीलदार सुषमा आव्हाड-बांगर यांना निवेदन दिले आहे. डोंबिवली पश्चिमेकडील पु. भा. भावे सभागृहातील सेतू सुविधा केंद्र सुरु करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे कल्याण जिल्हा संघटक मिलिंद साळवे यासंह बाजीराव माने, सुरेंद्र ठोके, राजू काकडे, नंदू पाईकराव, अर्जुन केदार आदींनी केली.
498 total views, 2 views today