पत्रकारांसह वृत्तपत्र – वाहिन्यांना वीजबील माफ करा

रिपाइं एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांची राज्य शासनाकडे मागणी

ठाणे : कोरोनाच्या या काळात जनतेमध्ये जनजागृती चे प्रभावी काम वृत्तपत्र, प्रसार माध्यम करीत आहे. या कालावधीत सध्या प्रसारमाध्यमांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. व्यवस्थापनाकडे उत्पन्न नसल्याने या पत्रकारांच्या वेतनांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक कपात केली आहे. म्हणून सरसकट सर्व पत्रकारांची विजबिले माफ करण्यासह वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांं, प्रिटींग प्रेस यांच्या विज बिलांमध्ये ५० टक्क्यांची सूट द्यावी, अशी मागणी येथील रिपाइं एकतावादीचे युवा नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्याकडून राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे वृत्तपत्रांना जाहिराती मिळेनाशा झाल्या आहेत. त्याचा फटका फिल्डवर कार्यरत पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामेन यांना सर्वााधिक बसत आहे. व्यवस्थापनाकडे उत्पन्न नसल्याने या पत्रकारांच्या वेतनांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक कपात केली आहे. म्हणून सरसकट सर्व पत्रकारांची विजबिले माफ करावित. तसेच, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांंची कार्यालये, त्यांच्या प्रिटींग प्रेस यांच्या विज बिलांमध्ये ५० टक्क्यांची सूट द्यावी, अशी मागणी इंदिसे यांच्याकडून राज्य शासनाकडे लावून धरण्यात आली आहे.
कोरोनाच्या या संचार बंदीत प्रसार माध्यमांकडून उत्तम कामगिरी केली जात आहे. त्यांच्या माध्यमातून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन आधार दिला जात आहे. त्यामुळे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ टिकला तरच लोकशाही टिकणार आहे. त्यामुळे माध्यमे आणि माध्यमकर्मींना वीजबिलांमध्ये सवलत दिलीच पाहिजे, या मागणीसह अन्य विजबिलांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचीही तयारी असल्याचा इशारा ईंदिसे यांनी शासनाला दिला आहे. त्यांच्या या आंदोलनात संदर्भात सोशल मीडियावर ही त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 521 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.