मनसेने ठोकले महावितरण कार्यालयाला टाळे

वाढीव वीज बिलाच्या विरोधात केले आंदोलन, वहन आकार आणि प्रत्येक युनिट मागे वाढवण्यात आलेला आकार रद्द करण्याची केली मागणी

ठाणे  : कोरोनाच्या काळात हाताला काम नसताना देखील नागरिकांना वाढीव वीज बिल मिळाली आहेत. एकीकडे बेरोजगारी वाढली असताना दुसरीकडे
वाढीव वीज बिल आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर  ठाण्यात मनसेच्या वतीने लोकमान्य नगर येथील महावितरण कार्यालयावर  कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकून गेट बाहेर महावितरण विरोधात घोषणाबाजी केली.
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे,महाराष्ट्र सरकारने जाहिर केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची सर्वसामान्य जनता ही गेल्या ४ महिन्यांपासून घराबाहेर पडू शकली नाही.यामुळे अनेकजणांना वर्कफ्रॉम होम करावा लागला,तर कितेकजण बेरोजगार देखिल झाले.बेरोजगारीमुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावले आहे.राज्य सरकाराने या नैसर्गिक आपतीकाळात जनतेला कोणत्याही प्रकारे आर्थिक दिलासा दिला नाही. या संकटकाळातच महाराष्ट्र राज्य विज वितरण महामंडळाने सर्वसामान्य विज ग्राहकांनचे विज मिटर वाचन (रिडिंग) न घेता सरासरी विज देयक पाठवून दिलीत.
लॉक डाऊन च्या काळामध्ये वीज ग्राहकांना वाढिव वीजबिल देण्यात आली आहेत. ज्यामध्ये वहन आकार आणि प्रत्येक युनिट मागे आकार वाढविण्यात आल्यामुळे ही वाढीव बिले आली असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. हे आकार त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी मानेचे उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे, सौरभ नाईक,निलेश चौधरी,राजेंद्र कांबळे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते.

 382 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.