ऑलिम्पिकच्या धर्तीवर राज्य आणि जिल्हास्तरीय स्पर्धांचा प्रस्ताव

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी केले सूतोवाच


क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य राज्यसुवर्ण महोत्सवानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धांचे स्वरूप  यावर राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न

कल्याण : आगामी काळात महाराष्ट्र  ऑलिम्पिक संघटनेतर्फे ऑलिम्पिकच्या धर्तीवर महाराष्ट्रात राज्य आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सहसचिव नामदेव शिरगावकर यांनी सुतोवाच केले आहे. शासनाच्या,  क्रीडा व युवक सेवा संचालनालय खात्याला ५० वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्ताने कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळ आयोजित  शालेय क्रीडा स्पर्धांचे स्वरुप बदलणे – काळाची गरज” या विषयावर झालेल्या आॅनलाईन राज्यस्तरीय परिसंवादात सहभागी होताना शिरगावकर यांनी हे संकेत दिले.
रविवारी झालेल्या या परिसंवादात राज्यातील १४०० क्रीडाप्रेमींनी  फेसबुक लाईव्ह मीटिंगच्याद्वारे सहभाग घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला. परिसंवादामध्ये बोलताना भारतीय धनुर्विद्या महासंघाचे सचिव प्रमोद चांदुरकर म्हणाले,  नवनवीन खेळांना प्रोत्साहन देणे व खेळाच्या आयोजन तालुका स्तरापासून राज्य स्तरापर्यंत योग्य पद्धतीने व्हावे यावर भर दिला  .  नामदेव शिरगावकर यांनी केंद्रीय क्रीडा विभागाप्रमाणे प्रमाणे शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभाग वेगवेगळ्या करण्यावर भर दिला जाईलअसे सागितले. महाराष्ट्र ऑलम्पिकचे सदस्य अशोक दुधारे यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या संघटक व कार्यकर्त्यांनाही शिवछत्रपती राज्य पुरस्कार पुन्हा सुरू करावा यावर भर दिला. परिसंवादात वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातील खेळाडू पालक मार्गदर्शक शिक्षक क्रीडा कार्यकर्ते व संघटक सहभागी झाले होते. त्यात  नाशिकचे क्रीडाधिकारी रविंद्र नाईक,  जेष्ठ क्रीडा पत्रकार शिवाजी गोरे, क्रीडा मार्गदर्शक डॉ.उदय डोंगरे , प्राध्यापक अभय बिराज,  पीयूष अंबुलकर,
नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी परमेश्र्वर मोरे  पालक प्रतिनिधी सागर गुल्हाने यांचा समावेश होता. हा परिसंवाद यशस्वी होण्यासाठी कल्याण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण इंगळे, परिसंवादाचे समन्वयक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी अंकुर आहेर, कार्याध्यक्ष उदय नाईक, कार्यवाह राजेंद्र शेटे, क्रीडा शिक्षक गजानन वाघ, क्रीडा पत्रकार अविनाश ओंबासे,  क्रीडाचे तांत्रिक जाणकार गुणेश सर यांनी परिश्रम घेतले.

 622 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.