अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्याची केली आपल्या चाहत्यांना केली विनंती
शहापूर : शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपजिल्हा सपर्कप्रमुख संतोष (भाऊ) परशुराम शिंदे यांनी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस अभिनव शुभेच्छा स्विकारुन साजरा करण्याचे ठरवले आहे.
शहापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रजनी शिंदे यांचे पती व शिवसेनेचे ठाणे-पालघर उपजिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंदे यांचा येत्या ३१ जुलै रोजी वाढदिवस असून त्यांनी तो अत्यंत साधेपणाने परंतु अनोख्या पध्द्तीने साजरा करण्याचे ठरविले आहे.
वाढदिवसाच्या दिवशी विविध स्तरातील शेकडो लोक अभीष्टचिंतन करण्यासाठी येतात. कोरोनाची पार्श्वभूमि लक्षात घेता सोशल डिस्टसिंग व इतर नियम पाळणे आवश्यक असते.यावेळी पुष्पगुच्छ, भेटवस्तू न देता व बॅनर न लावता इच्छा असल्यास रोख रकमेच्या स्वरुपात त्याच्या बॅक खात्यात जमा करावी असे आवाहन त्यानी केले असून जमलेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधि साठी दिली जाईल असे आवाहन त्यानी एका पत्रकाद्वारे केले आहे.
515 total views, 2 views today