राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी मुरबाडच्या कोव्हिडं सेंटरवर जाऊन रुग्णांशी साधला संवाद; आरोग्याची केली विचारपूस
ठाणे : कोरोना साथरोगाशी झुंज देणाऱ्या, कोरोना रुग्णांची मुरबाडच्या कोव्हिडं सेंटरवर जाऊन राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी कोव्हिडं रुग्णांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. घाबरू नका जिल्हा परिषद आपल्या पाठीशी असल्याचे सांगत मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुग्णांना च्यवनप्राशचे वाटप करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त कोव्हिडं यौध्याचे सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहानाला प्रतिसाद देत राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी विविध ठिकाणी दौरे करून कोव्हिडं रुग्णांसह कोव्हिडं यौद्यांचा यथोचित सन्मान केला.
या दौऱ्या दरम्यान पडघा येथील खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांचा ते बजावत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पाटील आणि लोणे यांनी पीपीकिट, मास्क, छत्री, ड्रेस पीस, साडी आदी भेट वस्तू देऊन डॉक्टरांचा सन्मान केला.
तसेच म्हसा , शिवले, सरलगाव आदी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथिल डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत, कोरोनाच्या महामारीत बजावत असलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या कामाचे कौतुक करत च्यवनप्राशचे वाटप केले.
545 total views, 1 views today