आरोग्य सुविधांसाठी थेट आरोग्यमंत्र्यांना साकडे

आरोग्यमंत्र्यांकडून मिळाला सकारात्मक प्रतिसाद

अंबरनाथ : अंबरनाथ येथील कै. बी.जी.छाया उपजिल्हा रुग्णालय व उल्हासनगर येथिल शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सद्याच्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीत नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळावी यादृष्टीने तज्ञ वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व इतर आवश्यक सोयी सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत कार्यवाही करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिल्याअसल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.

 425 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.