सुभाष खडकबाण यांचे निधन

कुळगाव (बदलापूर) ग्रामपंचायतीचे तरुण सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली होती.

अंबरनाथ : ज्येष्ठ समाजसेवक सुभाष उर्फ भाऊ खडकबाण यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी, सून, जावई नातवडे असा परिवार आहे.
भाऊ खडकबाण कुळगाव (बदलापूर) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच होते. तरुण सरपंच म्हणून त्यांची कारकीर्द प्रचंड गाजली होती. छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे त्यांचे आराध्य दैवत होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत त्यांचा चार दशकांहून अधिक काळ सहवास होता. कल्पना राजे भोसले आणि छत्रपतींच्या घराण्याबरोबरच मंगेशकर कुटुंबीय, माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार, शिल्पकार अण्णा साठे, शस्त्र संग्राहक गिरीश जाधव आदी अनेकांच्या बरोबर भाऊंचे घनिष्ठ संबंध होते.
लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्याकाळी लालबहादूर शास्त्री यांनी देशात अन्न टंचाई असल्याने नागरिकांनी आठवड्यातून एकदा उपवास करावा त्यातून बरेच अन्न वाचू शकेल, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत भाऊंनी दर सोमवारी एक वेळ जेवण्याचे व्रत अंगिकारले आणि शेवटपर्यंत पाळले.

 522 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.