मनसेच्या महिला शहर अध्यक्षा शीतल विखणकर यांनी पालिका आयुक्तांकडे मागणी केली आहे.
कल्याण : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते आज पाटीदार भवन आणि आसरा फाऊंडेशन येथे कोव्हिड रुग्णांसाठी समर्पित आरोग्य केंद्राचा यांचा ऑनलाईन शुभारंभ सोहळा संपन्न झाला. या केंद्रांमध्ये महिलांसाठी विशेष कक्ष उभारण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला शहर अध्यक्षा शीतल विखणकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
पनवेल येथे एक कोविड केंद्रात एका मुलीच्या विनयभंगाची घटना घडली. ते पाहता सुरक्षेच्या दृष्टीने व उपचारासाठी या केंद्रात २५ %जागा या महिलांन करिता राखीव ठेवून त्याचे वेगळे कक्ष स्थापन करावे. सद्य परिस्थिती मध्ये महिलांना कोव्हीडची लागण झाल्यास त्यांना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. तरी महिलांसाठी या कोविड केंद्रात विशेष व्यवस्था करण्याची मागणी शीतल विखणकर यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
428 total views, 1 views today