संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य यांनी केले आयोजन
कल्याण : संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने राज्यस्तरीय , मूर्ती, कँलीग्राफी, स्केच, चित्रकला आणि डिजीटल पेंटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्रातील नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सचिन गुलदगड यांनी केले आहे.
आज करोनाने सर्वत्र आहाकार माजवलेलाल आहे. त्यामुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य ही डगमगले आहे. अनेक कलावंत आपापल्या घरात अस्वस्थ आहेत. आशा या परिस्थितीत कुंचल्याला, नाविन्यपूर्ण विचार शैलीला, कृतिशील कार्याला गती देण्यासाठी, ऊर्जा देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी, कार्यमग्न करण्यासाठी संत सावता माळी युवक संघाने या स्पर्धांचे आयोजन केले आले आहे. आद्यसंत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
कलाकारांनी तयार केलेली संत शिरोमणी सावता महाराज यांचे जीवन प्रसंगावर आधारित चित्र, मूर्ती, डिजीटल पेंटिंग , कॅलीग्राफी , स्केच बनवून प्रिंटिंग साईझ, हायर रेझुलेशन मध्ये पीडीएफ स्वरूपात santasawatamali@gmail.com या मेल आय डी वर १५ ऑगस्ट २०२० पर्यंत पाठवावे व सोबत स्पर्धकांचे संपूर्ण नाव, रहिवासाचा पत्ता , मोबाईल नंबर सह संपूर्ण माहीती पाठवावी.
या स्पर्धेसाठी चार चार गट बनविण्यात आले आहेत. १) मूर्ती २) कॅलिग्राफी, 3) डिजिटल पेंटींग ४) चित्रकला किंवा स्केच गटाप्रमाणे उकृष्ठ कलाकृती मधून प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात येतील. यात १) प्रथम पारीतोषीक- रोख रक्कम २१,१११/- सन्मानपत्र. २) द्वितीय पारीतोषीक – रोख रक्कम ११,१११/- सन्मानपत्र ३) तृतीय पारीतोषीक- रोख रक्कम ५५५५/- सन्मानपत्र असे असणार आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकांना सन्मापत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कैलास शिंदे – ९५०३९९२७४०, समाधान माळी ९८३४४३६५८७, प्रसाद शिंदे – ९०७५१६१२१९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद शेलकर यांनी केले आहे.
473 total views, 1 views today