लॉकडाऊन दरम्यान काम नाही म्हणून स्टंट करून बनवत होता व्हिडीओ
कल्याण : लॉकडाउन दरम्याम काम नसल्याने सोशल मिडियाच्या माध्यमातून पैसे कमाविण्यासाठी सापाला पकडून त्याचे खेळ करत आणि स्टंट करणाऱ्या एका इसमाला कल्याणच्या वन विभागाने नागपंचमीच्या दिवशीच अटक केली आहे.
डोंबिवलीच्या नांदीवली परिसरात राहाणारा निरव गोगरी हा बेकायदेशीपणो साप पडून त्यांचे व्हीडीओ तयार करीत होता. सापाशी स्टंट करणारे व्हीडीओ तो सोशल मिडीयावर व्हायरल करीत होता. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाने तत्काळ त्याचा शोध घेत कल्याणच्या वनखात्याने अटक केली आहे. हि कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे, वनरक्षक रोहित भोई, जयेश घुगे, राज्य राखीव पोलिस दलाचे सहा.पोलिस उपनिरीक्षक, मारुती काळे व वनविभाग राज्य राखीव पोलिस दलाचे पोलिस कर्मचारी यांनी केली.
708 total views, 1 views today