ठाणे शहरातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडा

 भाजपा युवा मोर्चाचे युवा नेते सचिन रावराणे यांची शासन व महापालिकेकडे मागणी

ठाणे  : ठाण्यातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडण्यात याव्यात अशी मागणी  भाजपा युवा मोर्चा युवा नेते सचिन रावराणे यांनी केली आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला किंवा इतर आजारातील रुग्णांना रक्ताची गरज पडल्यास नागरिकांना रक्त संकलन करण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये फिरावे लागते काही रक्त पिढ्यांमध्ये आवश्यक असलेले रक्त उपलब्ध नसल्याने नागरिकांना रक्तासाठी इतरत्र वणवण फिरावे लागते आणि रक्त उपलब्ध न झाल्याने देखील काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे त्यामुळे ज्याप्रमाणे शहरातील सर्व मेडिकल ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे एखादे औषध मेडिकलमध्ये मिळाले नाहीतर ते कुठल्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला कळते त्याच प्रमाणे ठाणे शहरातील सर्व रक्तपेढया ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे युवा नेते सचिन रावराणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे व महापालिका आयुक्त डॉ बिपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.
रुग्णांना रक्ताचा पुरवठा तातडीने व्हावा यासाठी वारंवार शहरात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत असतात.कोरोनाच्या पार्शवभूमीवर तर मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आले परंतु अजूनही नागरिकांना रक्ताची गरज लागली तर रक्तपेढ्यामधून रक्त उपलब्ध होते नाही त्यामुळे रुग्णांना रक्त वेळेवर न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहेत त्यामुळे नागरिकांना त्वरित रक्त उपलब्ध होण्यासाठी ठाणे शहरातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाईन नेटवर्किंग द्वारे एकमेकांना जोडण्यात याव्यात म्हणजे नागरिकांना कोणत्या रक्तपेढीत कोणते रक्तगटाचे रक्त उपलब्ध आहे याची माहिती मिळाले व नागरिकांना होणार त्रास कमी होईल असे सचिन रावराणे यांनी सांगितले. 

 455 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.