शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी केली होती पालकमंत्र्याकडे मागणी
बदलापूर : बदलापूर पालिकेला लवकरच पाच नव्या रुग्णवाहिका मिळणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून बदलापूर नगर परिषदेला पाच रुग्णवाहिका देण्याची मागणी मान्य केली असून दोन दिवसात या रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली आहे.
बदलापूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शिवसेना शहरप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातून बदलापूरला पाच रुग्णवाहिका देण्याची मागणी मान्य केली असून दोन दिवसांत या रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली.
खासगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणीबाबत रुग्णांच्या येणाऱ्या तक्रारी लक्षात घेता, बदलापूरमधील नागरिकांसाठी ५०० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. ज्यामध्ये ऑक्सिजन तसेच व्हॅटिलेटरची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे. या रुग्णालयाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लवकरच बदलापूरला भेट देणार असल्याचेही वामन म्हात्रे यांनी सांगितले.
504 total views, 1 views today