भावली धरण जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेला लवकरच मंजुरी


भावली धरणाच्या पाहणी दरम्यान जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना आश्वासन

शहापूर (शामकांत पतंगराव) : राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज नाशिकच्या दौऱ्या दरम्यान इगतपुरी येथील भावली धरणाची पाहणी केली.या वेळी शहापुरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी त्यांची भेट घेऊन भावली पाणी योजनेला शासनाने मान्यता दिली असून जलशुद्धीकरण योजनेसाठी धरणाखाली जागा उपलब्ध होण्यासाठी मंत्रालयस्तरावर प्रस्ताव तयार असून त्याला मंजुरी मिळावी अशी मागणी केली. दरम्यान शहापूर तालुक्यासाठी भावलीचे पाणी मागण्याचा हट्ट अजूनही सोडला नसल्याचे बरोरा यांनी दाखवून दिले.
राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शहापूर मार्गे मोटारीने नाशिक दौरा केला.या दरम्यान ते ईगतपुरी येथे असलेल्या भावली धरणाला आज सकाळी भेट देणार असल्याचे खात्रीलायक कळताच माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी जयंत पाटील यांची भावली धरणाच्या ठिकाणी भेट घेतली.वर्षोनुवर्षे भयानक पाणीटंचाईला तोंड देणाऱ्या शहापूर तालुक्यातील जनतेला भावलीचे पाणी मिळावे यासाठी अतोनात प्रयत्न करणाऱ्या पांडुरंग बरोरा यांनी भावलीच्या पाण्याचा हट्ट आपण अजूनही सोडला नसल्याचे यावेळी दाखवून दिले.
शहापूर तालुक्यासाठी भावली पाणी योजनेला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असून जलशुद्धीकरण केंद्रासाठी जलसंपदा विभागाची धरणाच्या खाली असलेली जमीन उपलब्ध होणेसाठीचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर प्रलंबित असून त्याला मंजुरी देण्याची मागणी केली असता या प्रस्तावाला त्वरित मान्यता देण्यात येईल असे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या वेळी आश्वासन दिले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

 513 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.