एकाला भिवंडीत तर दुसऱ्याला आंबिवलीहून घेतले ताब्यात
कल्याण : गुराची चोरी करुन कत्तल करणाऱ्या दोघांना खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अफजल तस्लीम खान (३३) आणि कैस मतरूझा डोन (३१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
मोहने परिसरात राहणारे दूध विक्रेते संतोष सिंग यांच्या तबेल्यासमोर झाडाला बांधलेली जर्सी गाय चोरी करुन तिला कापली होती. तिचे काही अवशेष त्याच ठिकाणी सोडून कत्तल करणारे चोरटे पसार झाले होते. ही घटना ५ जून रोजी घडली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटने पाठोपाठ १९ जुलै रोजी मोहने परिसरातील रोशन जगताप यांच्या घराच्या परिसरात फिरणारी काळी व तपकीरी रंगाची गाय काही अज्ञात चोरटय़ांनी चोरी करून कत्तल रस्त्याच्या कडेला केली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु करत तपास पथकाने आरोपी खान याला भिवंडी येथील नदी नाका येथून अटक केली. तर दुसरा आरोपी डोन याला आंबिवली येथून अटक केली आहे.
606 total views, 1 views today